PM Internship Yojana नमस्कार मित्रांनो, प्रत्येक तरुणाला भारत सरकारने इंटरनॅशनल योजनेअंतर्गत पाच हजार रुपये प्रति महिना कमावण्याची संधी दिलेली आहे. पीएम इंतरंशिप असा या योजनेचे नाव असून या योजनेअंतर्गत प्रत्येक युवकाला महिन्याला पाच हजार रुपये मिळणार आहे. हा सरकारचा एक पायलट प्रोजेक्ट असणार आहे. तीन ऑक्टोबर या दिवशी ही योजना सुरू करण्यात आलेली असून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024-25 च्या अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा आणि माहिती दिलेली आहे.
महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे 3 हजार रुपये मिळण्यास झाली सुरुवात, तुमचे नाव करा चेक
पीएम इंटर्नशिप योजना आहे तरी काय?
पीएम इंटर्नशिप योजनेअंतर्गत 5 वर्षांत देशातील सुमारे 1 कोटी तरुणांना कंपन्यांमध्ये इंटर्नशिप दिली जाणार आहे. या योजनेत इंटर्नला दरमहा 5,000 रुपये दिले जातील. त्यापैकी 4500 रुपये भारत सरकार आणि 500 रुपये इंटर्नशिप देणारी कंपनी देईल. या योजनेअंतर्गत निवडलेल्या उमेदवारांची यादी 26 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करता येणार आहे. 27 नोव्हेंबरपर्यंत कंपन्या अंतिम निवड करतील आणि 2 डिसेंबर 2024 पासून 12 महिन्यांसाठी इंटर्नशिप सुरू होईल.
टॉप 500 कंपन्या देणार इंटर्नशिप!
पीएम इंटर्नशिप योजनेअंतर्गत तरुणांना भारतातील टॉप 500 कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळेल. पाच वर्षांच्या कालावधीत 1 कोटी तरुणांना इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. सुरुवातीला इंटर्नशिपमध्ये सहभागी होण्यासाठी 6,000 रुपये एकरकमी आर्थिक सहाय्य दिले जाईल. त्यानंतर एक वर्षासाठी प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाईल.
या वेबसाईट वरती करा नोंदणी.
10 ऑक्टोबरपर्यंत कंपन्या त्यांच्या गरजा आणि इंटर्नशिप पोस्ट्सची माहिती देतील. इच्छुक तरुण 12 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून या 👉 www.pminternship.mca.gov.in पोर्टलवर नोंदणी करु शकतील. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची यादी 26 ऑक्टोबरपर्यंत कंपन्यांना दिली जाईल.