Ration Card E KYC इ-केवायसी नाही केली तर राशन मधून नाव होणार बाद, जाणून घ्या कशी करायची घरबसल्या केवायसी.?

Ration Card E KYC आता शासकीय योजनेच्या लाभार्थी असलेल्या प्रत्येकांना केवायसी राशन कार्डची करणे अनिवार्य असणारा आहे आणि ही जर केवायसी नाही केली तर राशन कार्ड मधून तुमचे नाव कट होऊ शकणार आहे. अशातच बरेचसे नागरिकांकडे आता रेशन कार्ड बद्दल इ केवायसी बंधनकारक करण्यात आलेली आहे आणि ही केवायसी यासाठी केलेली आहे की जो माणूस मयत झालेला आहे त्या माणसाच्या नावावर सुद्धा बरेचसे नागरिक अनधिकृत योजना किंवा रेशन घेत आहेत. त्यासाठी याची केवायसी करून घेणे अनिवार्य आहे अन्यथा तुमचे नाव रेशन कार्ड मधून बाद करण्यात येणार आहे. आता आपण रेशन कार्ड केवायसी कशा पद्धतीने करायचे आहे हे जाणून घेणार आहोत.

हे पण वाचा, “या” नागरिकांना मिळणार विनाअट घरकुल, अर्ज झाले सुरू.

प्रत्येक राशन कार्डधारकाला आता ई केवायसी बंधनकारक झालेली असून शिधापत्रिकेमध्ये नाव असलेल्या कुटुंबामधील सर्व सदस्यांनी केवायसी पडताळणी पूर्ण न केल्यास त्यांना राशन वितरणाचा लाभ मिळणार नाही. असे पुरवठा विभागाकडून आवाहन करण्यात आलेली आहे. त्यामुळे रेशन कार्डधारकांनी लवकरात लवकर केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. आता आपण दोन प्रकारे केवायसी करू शकतो एक तर रेशन कार्ड दुकानांमध्ये जाऊन आपण केवायसी करून घेऊ शकतो आणि दुसरी पद्धत म्हणजे मेरा राशन या ॲप्लिकेशनच्या मदतीने सुद्धा आपण घरबसल्या केवायसी करू शकणार आहोत.

रेशन दुकानात जाऊन करू शकता केवायसी

आपलं रेशन ज्या दुकानदाराकडे येत आहे त्या दुकानदारांकडे फोरजी मशीन असते या मशीनद्वारे आपण केवायसी करू शकतो.

यासाठी आपला आधार कार्ड घेऊन जायचं आहे आणि या ठिकाणी मशीन मध्ये आधार नंबर टाकून वेरिफिकेशन केलं जातं.

यानंतर संबंधित व्यक्तीच्या बोटाचे ठसे किंवा डोळे स्कॅन करून ई केवायसी प्रक्रिया पूर्ण होते.

मेरा रेशन एप्लीकेशन च्या मदतीने करा केवायसी

प्ले स्टोअर मध्ये जाऊन किंवा इथे क्लिक करून सुद्धा मेरा रेशन एप्लीकेशन आपण डाऊनलोड करू शकता.

एप्लीकेशन सुरू झाल्यानंतर आपल्याला आपला रेशन कार्ड नंबर किंवा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर आधार सीडिंग या ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे.

आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या नावापुढे आधार सीडींग yes किंवा no असा ऑप्शन आपल्याला दिसणार आहे.त्यानंतर सदस्याच्या नावापुढे एस ऑप्शन दिसेल त्या सदस्याला केवायसी करायची गरज नाही. आणि ज्या सदस्याच्या पुढे नो नाव दिसेल त्यावर आपल्याला केवायसी करावी लागणार आहे.

घरबसल्या केवायसी करण्या साठी आपण राज्याच्या खाद्य पुरवठा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन सुद्धा केवायसी करू शकतो. त्याची लिंक आम्ही खाली दिलेली आहे.

अधिकृत संकेतस्थळhttps://mahafood.gov.in/website/marathi/home.aspx

Leave a Comment