Atal Pension Yojana महिला असो किंवा पुरुष प्रत्येकाला प्रति महिना 5 हजार रुपये मिळणार, सरकारच्या या योजनेचा घ्या लाभ.

Atal Pension Yojana नमस्कार मित्रांनो, महिला सो किंवा पुरुष प्रत्येकाला प्रति महिना पाच हजार रुपये मिळतील पण या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा हे आम्हालाही वाटतं आणि त्याचमुळे आम्ही या योजनेबद्दल सर्वांना माहिती देणार आहोत. मित्रांनो केंद्र आणि राज्य शासनाच्या अंतर्गत समाजामधील वेगवेगळ्या घटकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवल्या जात असतात या योजनाच्या माध्यमातूनच समाजहित जोपासण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात असतो. यास प्रयत्नांचा भाग म्हणून ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारने वेगवेगळ्या प्रकारच्या योजना सुरू केलेल्या आहेत.

एस-टी च्या तिकीट दरांमध्ये झाली मोठ्या प्रमाणात वाढ, पहा नवीन दर

उतरत्या वयामध्ये ज्येष्ठ नागरिकांना पैशांची अडचण भासत असते आणि हीच अडचण कमी व्हावी यासाठी सरकारने अटल पेन्शन योजना सुरू केलेली आहे. अटल पेन्शन योजना ही केंद्रांमधील मोदी शासनाची एक महत्त्वकांक्षी पेन्शन योजना ठरलेली आहे. या पेन्शन योजनेच्या अंतर्गत वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्याच्या नंतर नागरिकांना प्रति महिना 5000 रुपयांपर्यंत पेन्शन मिळणार आहे. पण मित्रांनो या योजने करिता अगोदर आपल्याला काही पैसे गुंतवावे लागणार आहेत आणि त्यानंतरच ही पेन्शन आपल्याला सुरू होणार आहे.

या योजनेत असा सहभाग नोंदवा

या योजनेमध्ये सहभाग तुम्ही घेतल्यानंतर अगोदर आपल्याला पैसे गुंतवावे लागणार आहेत आणि यानंतर आपली वयाची साठ वर्षे कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला प्रतिमाहा 5000 रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकणार आहे. म्हणजेच एका वर्षात 60000 रुपयांची पेन्शन आपल्याला मिळू शकणार आहे. अशा परिस्थितीमध्ये आता आपण अटल पेन्शन योजनेची सविस्तर माहिती घेत आहोत. एका दृष्टिकोनाने पाहिले तर ही योजना खूपच जुनी आहे पण बऱ्याचश्या नागरिकांना या योजनेची माहिती नसल्यामुळे सर्वच नागरिक या योजनेपासून वंचित राहिलेले आहेत.

हे पण वाचा, “या” नागरिकांचे राशन कार्ड होणार बंद

अटल पेन्शन योजना काय आहे.?अटल पेन्शन योजना मध्ये कुठलाही भारतीय नागरिक महिला किंवा पुरुष गुंतवणूक करू शकणार आहे. ही पेन्शन योजना भारतामधील 18 ते 40 वर्ष वयोगटांमधील नागरिकांसाठी चालू करण्यात आलेली आहे. या पेन्शन योजनेमध्ये एखाद्या पुरुषाने किंवा महिलेने 18 व्या वर्षी गुंतवणूक जर करण्यास सुरुवात केली तर त्यांना साठ वर्षे वयापर्यंत प्रति महिना 210 रुपये गुंतवावे लागणार आहेत. आणि अठराव्या वर्षी प्रति महिना 210 रुपये याप्रमाणे जमा झाले तर वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर या नागरिकांना प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपयाची पेन्शन मिळणार आहे म्हणजेच एका वर्षात 60000 रुपये पेन्शन आपल्याला मिळू शकते. अशा प्रकारची आहे अटल पेन्शन योजना.

इथे करावा अटल पेन्शन योजनेसाठी अर्जजर आपल्यासह कोणाला अटल पेन्शन योजनेमध्ये अर्ज करायचा आहे आणि यामध्ये गुंतवणूक करण्याचा तुमचा विचार असेल तर जवळील बँकेमध्ये जाऊन अटल पेन्शन योजनेचा फॉर्म तो बँकेमध्ये भरून जमा करायचा आहे. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला काही डॉक्युमेंट्स अर्थात पॅन कर्ड आधार कार्ड आणि बँक पासबुक लागणार आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अटल पेन्शन योजना विषयी सविस्तर माहिती व्हिडिओद्वारे तुम्ही जाणून घेऊ शकता.

अटल पेन्शन योजने बद्दल अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

Leave a Comment