UPSC exam ची तयारी कशी सुरु करावी ? | How to prepare UPSC Exam 2024

UPSC exam ची तयारी कशी सुरु करावी ?

यूपीएससी म्हणजे “Union Public Service Commission” ही परीक्षा देशातील उच्च स्तरावर असलेली मोठी परीक्षा आहे. ही संस्था सेवा अधिकारी निवडण्यासाठी परीक्षा आयोजित करते जसे की ( ‘IAS’, ‘IPS’, ‘IFS’ इत्यादी. ).

तुम्ही यूपीएससी करण्यासाठी नवीन आहासाल तर तुम्हाला सगळ्यात आधीच हे समजून घेतले पाहिजे की यूपीएससी आयएएस परीक्षा ही भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे ज्यासाठी तुम्हाला खूप कठोर परिश्रम करणे आवश्यक आहेत.

आय ए एस परीक्षा तीन टप्प्यात घेतली जाते प्रत्येक टप्प्याची स्वतःची अडचण (level of difficulty) असते.

एक यशस्वी आय ए एस ( IAS ) होण्यासाठी तुम्हाला तुमची मानसिकता मजबूत बनवावी लागेल कारण तयारीचा प्रवास हा खूप चढउतारांनी भरलेला आहे तुम्हाला हुशारीने आणि कठोर काम करण्यास तयार राहावे लागेल भरपूर अभ्यास त्याचे साहित्य वाचणे गरजेचे आहे आणि त्यावरील नोट्स बनवणे हेही फार गरजेचे आहे दररोज पुनरावृत्ती करणे आणि बरेच काही.

यूपीएससी साठी नवीन असलेल्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाची तयारी कशी सुरु करावी यावरही काही प्रमुख पायऱ्या खाली दिलेल्या आहेत.

परीक्षेचा पॅटर्न आणि अभ्यासक्रम समजून घ्या :

यूपीएससी साठी नवीन विद्यार्थी तयारी करत असाल तर त्याची पहिली पायरी म्हणजे आयएएस (IAS) परीक्षेची पद्धत आणि अभ्यासक्रम समजून घेणे.यूपीएससी परीक्षेत प्राथमिक मुख्य आणि मुलाखत असे तीन टप्पे असतात प्राथमिक परीक्षा ही एक वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असते आणि जी की उमेदवाराच्या सामान्य अभिरुचीची चाचणी करते.

  • मुख्य परीक्षा ही व्यक्तीनिष्ठ असते आणि उमेदवाराच्या निवडलेल्या विषयांच्या जेवढं ज्ञान आहे त्यांच्या ज्ञानाची चाचणी घेते.
  • मुलाखत हा अंतिम टप्पा असतो ज्यात उमेदवाराचे व्यक्तिमत्व आणि संवाद कौशल्य तपासले जातात. प्रत्येक टप्प्यासाठी आयएएस अभ्यास समजून घेणे व त्यानुसार तयारी करणे महत्त्वाचे आहे.
  • प्राथमिक परीक्षेत उमेदवाराची योग्यता आणि सामान्य ज्ञान तपासले जाते आणि काही मूलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे आणि इतिहास भूगोल अर्थशास्त्र आणि नाराज का यांसारखे विशाल मध्ये आपला पाया मजबूत करणे महत्त्वाचे आहे.

 

यूपीएससी प्रिलिम्स च्या तयारीसाठी काही महत्त्वाच्या टिपा खालील प्रमाणे दिलेल्या आहेत:

  • मूलभूत गोष्टींमध्ये आपला पाया मजबूत साठी “एनसीआरटी” “NCERT” पुस्तकांवर अधिक लक्ष केंद्रित करा.
  • चालू घडामोडींवर अपडेट राहण्यासाठी नियमितपणे आपण वर्तमानपत्रे आणि मासिके वाचावा.
  • वेग आणि अचूकता सुधारण्यासाठी यूपीएससी पिलिम्स च्या मॉक टेस्ट आणि मागील वर्षाचे काही प्रश्नपत्रिकांचा सुद्धा सराव करा.

योग्य विषय निवडा :

मुख्य परीक्षेच्या टप्प्यात उमेदवारांना त्यांच्या यूपीएससी द्वारे प्रदान केलेल्या 38 विषयांच्या यादी मधुन एक विषय निवडणे आवश्यक आहे. तुम्हाला ज्या विषयात चौरस आहे व त्या विषयाबद्दल पूर्ण ज्ञान आहे किंवा तो विषय निवडणे उचित आहे

तर तुम्ही तो विषय निवडावा.अधिक गुण मिळवणारा आणि उत्तम अभ्यास साहित्य उपलब्ध असलेलाच विषय निवडणे महत्त्वाचे आहे.

नवीन उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या टिपा:

मुख्य परीक्षा ही उमेदवाराच्या विषयांच्या तपशील यावर त्यांच्या ज्ञानाची चाचणी घेते. प्रिलिम्स पक्षाच्या विपरीत जी मुख्य परीक्षा आहे ती व्यक्तीनिष्ठ असते. उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिका तपशील वर उत्तरे लिहावे लागतील.

” यूपीएससी मेन ” तयारीसाठी काही प्रमुख टिप्स समाविष्ट आहेत:
  • यूपीएससी च्या मुख्य पेपर साठी रेफरन्स पाठ्यपुस्तके आणि संदर्भ पुस्तके वाचा.
  • लेखन कौशल्य सुधारण्यासाठी नियमितपणे उत्तर लिहिण्याचा सराव करावा.
  • विचारलेल्या प्रश्नांचा नमुना समजून घेण्यासाठी आणि प्रकार समजून घेण्यासाठी यूपीएससीच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करा व त्या चांगल्या पाहून घ्या.

कोचिंग करणार का स्वतः अभ्यास यावर निर्णय घ्या:

कोचिंग इन्स्टिट्यूट मध्ये सामील होण्याचा किंवा स्वयं अभ्यास करण्याचा निर्णय व्यक्तीच्या पसंती वर आणि संसाधनांवर अवलंबून असतात नवीन उमेदवारांना प्रभावीपणे तयार करण्यासाठी कोचिंग संस्था मार्गदर्शन, समर्थन संसाधने प्रदान करतात.

उत्तम रेकॉर्ड असलेल्या कोचिंग इन्स्टिट्यूट चीच निवड अत्यावश्यक आहे हे समजून घ्या आणि संबंधित खर्च लक्षात ठेवणे हे देखील महत्त्वाचे आहे.जर एखाद्या स्वतः अभ्यास करण्याची ची सवय असेल व शिस्तबद्ध पद्धतीने पालन करत असेल तर स्वयं-अभ्यास देखील प्रभावी ठरवू शकतो.

अभ्यास प्लॅन तयार करा:

नवीन उमेदवारांसाठी यूपीएससी तयारी करण्याकरिता अभ्यासाची प्लॅनिंग करणे महत्वपूर्ण आहे अभ्यास करताना पद्धतशीर आणि कार्यक्षम रीतीने अभ्यास केला पाहिजे व त्याची पुनरावृत्ती आणि सरावासाठी अधिक वेळ दिला गेला पाहिजे त्यासाठी सिद्ध शिस्तबद्ध राहणे अतिशय महत्त्वाचे आहे, अश्या प्लॅनिंग वर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे.

नियमित सराव:

यूपीएससीच्या तयारीसाठी मॉक टेस्ट व मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा आणि इतर सर्व अभ्यास सराव नियमितपणे करणे महत्त्वाचे आहे. याने तुमचा आत्मविश्वास वाढवण्यात मदत होईल आणि कमकुवतपणा ओळखण्यात व सुधारण्यात मदत होईल.

सकारात्मक आणि प्रेरित राहा:

काही वेळा निराश वाटणे हे साहजिक असले तरीही अत्यंत स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळवायचा असेल तर तुमची यूपीएससी तयारी करताना प्रेरित राहणे महत्त्वाचे आहे.वास्तववादी उद्दिष्टे ठरवून प्रेरणा शोधून सकारात्मकतेने स्वतःला घेरून तुमच्या ध्यान व लक्ष केंद्रित करायचा आहे व तुम्हाला स्वतःचे मोठे चित्र लक्षात ठेवून स्वतःला प्रेरित करायचे आहे.

 

नवीन उमेदवारांसाठी पुस्तके:

तुम्ही नवीन उमेदवार म्हणून यूपीएससी करत असाल तर कुठून सुरुवात करावी आणि तयारीसाठी कोणकोणत्या पुस्तकांचा संदर्भ घ्यावा. कोणता अभ्यासक्रम गरजेचा आहे. आपल्याला तयारीसाठी वापरण्यासाठी सर्वोत्तम पुस्तके शोधणे आव्हानात्मक असू शकते.

यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्या साठी योग्य अभ्यास साहित्य ची निवड करणे आवश्यक आहे तुमच्यासाठी गोष्टी सुलभ करण्यासाठी आम्ही खास तुमच्यासाठी नवीन उमेदवारांसाठी यूपीएससी पुस्तकांची यादी तयार केली आहे

ही पुस्तके यूपीएससी अभ्यासक्रमातील विविध विषयांचा समावेश करतात. आणि तुमच्या तयारीला अधिक मजबूत पाया देतात. ही पुस्तके वाचून आपण विषय आणि विषयांची चांगलीच समज विकसित करू शकतो आणि आपल्याला तयारीमध्ये आत्मविश्वास प्राप्त होतो.

यूपीएससी पुस्तकांची यादी खालील प्रमाणे :

एम. लक्ष्मीकांत यांचे – इंडियन पोलिटी ( भारतीय राजकारण ) -यूपीएससी चौकांसाठी भारतीय राजकारण आणि राज्यघटना समजून घेण्यासाठी खूप महत्त्वाचे पुस्तक आहे यात मार्गदर्शक तत्वे मूलभूत अधिकार याबद्दल इत्यादी विषयांचा समावेश आहे.

राजीव अहिर यांचे – अ ब्रिफ हिस्टरी ऑफ मॉडर्न इंडिया ( आधुनिक भारताचा संक्षिप्त इतिहास ) -आठव्या शतकाच्या मध्यापासून दे आज पर्यंत आधुनिक भारताचा इतिहास भारतात संविधान भारतीय राष्ट्रीय चळवळ भारतासमोरील यांसारखे आव्हाने अशा विविध विषयांचा या पाठ्यपुस्तकामध्ये समावेश आहे.

मजिद हुसैन यांचे – जॉग्रफी ऑफ इंडिया ( भारताचा भूगोल )
या पुस्तकामध्ये भारताचा भौतिक सामाजिक आणि आर्थिक भूगोल समाविष्ट आहे. त्यातले त्यात हवामान शेती भौस्वरुप नैसर्गिक संसाधने उद्योग वाहतूक विद्यार्थी माहितीचा समावेश आहे.

Leave a Comment