10 वी नंतर मुलींनी कोणते कोर्स करायला हवेत ?
नमस्कार मत्रांनो,
जसे की तुम्ही पाहता आज सर्वत्र महिला कुठेच आणि कोणत्याच फील्ड मध्ये मागे नाहीत. आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालणाऱ्या महिला आहेत. एक काळ होता तेव्हा महिलांनी फक्त घर संभळावे अशी परंपरा च आपल्या भारतीय संस्कृती मध्ये होती, पण आता संपूर्ण काळ बदललाय जस जसे काळ बदलत गेलाय तसतसे महिलांचा विकास होत राहिलाय.
आजच्या युगात आपल्याला कुठेच असे पाहण्यास मिळत नाही की महिला ने या क्षेत्रात पाऊल ठेवला नसेल. महिला आता त्यात्या क्षेत्रांत पण चांगले काम करायल्यात की जे त्यांच्या साठी नव्हते. जवळ पास सर्व महिला वर्ग आता विकसित आहे ,
शहरांपासून ते गाव , खेड्यांपर्यंत महिला कुठेच मागे नहित.
अस मानल जात होत की महिला फक्त चर्चा,गप्पा, आणि संसार या च कामात चांगली असतात. पण त्यांना पहिल्या काळात कोणीच चान्स , मौका देत नसायचं की त्या पण काही वेगळ करू शकतात म्हणून, पण आता ची परिस्थिती जरा वेगळीच आहे. आज महिला जवळपास पुरुषांपेक्षा ही चांगली कार्य करताना दिसून येत.
चला तर बघूया की 10 वी पास असल्याल्या मुलींसाठी सर्वोत्तम
कोर्सेस कोणते आहेत.
महिलांच्या विशेष अश्या कौशल्यता :सर्जनशीलता आणि नवप्रवर्तन – अनेकदा महिलांना आपली रचनात्मकता,सर्जनशीलता दाखवण्या करीता खूप विविध संधींचा असा सामना करावा लागतो, पण कामात सुधारणा आणि नवनवीन शोध आणण्यास त्यांची बरबरी कोणी नाही करू शकत.
कार्याकडे लक्ष – स्त्रिया सामान्यत – प्रत्येक गोष्टीवर अधिकतम लक्ष केंद्रित करतात, या कारणाने त्या योग्य त्या पदावर राहून सर्व कार्य व्यवस्थित रित्या पार पाडतात.
आत्मविश्वास / confidence – महिला असो किंवा पुरुष असो आत्मविश्वास हा गुण आपल्या मध्ये असलाच पाहिजे,
ही महिला , तो पुरुष असे भेदभाव नको करायला. प्रत्येकजण समान समान मानून आपले कार्य करतात , महिलांना याने आत्मविश्वास मिळतो आणि त्यांचा यात हळू हळू आत्मविश्वास वाढतच जातो.
सहानुभूतशील – महिला अधिक तर भावनाशील असतात. त्या दुसऱ्यांचा भावना लवकर समजून घेतात. व्यावसायिक श्रेणी मध्ये लोकांची मागणी समजून घेतात.
विश्वासू – महिला असो किंवा पुरुष हा गुण दोघांत असला च पाहिजे , अतूट विश्वास विकसित झाला पाहिजे. ग्राहकाचा जनतेचा विश्वास निर्माण झाला पाहिजे.
याच आत्मसात केलेल्या कला-कौशल्यांमुळे इतरांच्या तुलनेत स्वतः उभा राहू शकतात. खाली काही कोर्सेस दिले आहेत ज्यात महिला आता चांगल्या पदांवर आहेत.
10वी नंतर मुलींसाठी अभ्यासक्रम कोणते
Top Career Options After 10th For Girls
* कॉम्प्युटर सायन्स / computer science
* आर्किटेक्चर / architecture
* इंटेरियर डिझायनिंग / interior designing
* फाईन आर्टस / fine arts
* हॉटेल मॅनेजमेंट / hotel management
* योगा / yoga
* एस्ट्रोलॉजी / Astrology
* फॅशन टेक्नॉलॉजी / Fashion Technology
* फूड इंजिनिअरिंग / Food Engineering
* हॉटेल केटरिंग / Hotel Catering
* केमिकल इंजिनिअरिंग / Chemical engineering
* डेरी इंजीनियरिंग / Dairy Engineering
* ऑफिस प्रॅक्टिस / Office Practice
* डिझाईन / Design
* बायोटेक्नॉलॉजी / Biotechnology
* जर्नालिझम / Journalism
* मास कम्युनिकेशन / Mass Communication
* इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / Information Technology
* हँडीक्राफ्टस / Handicrafts
* हॉस्पिटलिटी / Hospitality
* इन्स्ट्रुमेंट कंट्रोल / Instrument Control
तर मित्रांनो आता आपण पाहिले की मुलींसाठी सर्वोत्तम चांगले कोर्सेस कोणते आहेत. चला तर आता बघूया की उपलब्ध असलेल्या डिग्री कोणत्या आणि सर्टिफिकेशन कोर्सेस कोणकोणते. सर्व काही खाली दिलेल्या आहेत.