Ladki Bahin Yojana Rules नमस्कार मित्रांनो, महिलांना जास्त खुश होण्याची गरज नाही कारण की बऱ्याचशा महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे येणे बंद होणार आहे. मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा रजिस्ट्रेशन 15 ऑक्टोबर पर्यंत होतं त्यानंतर लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणे बंद होणार होते. आणि ज्या महिलांनी अर्ज केलेला आहे त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे.
हे पण वाचा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत या महिलांना मिळणार 5500 रुपये
लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही नियम व अटी लागू करण्यात आलेले आहेत त्याची पूर्तता जर आपण केली नाही तर आपल्या खात्यावर पैसे सुद्धा येणार नाहीत. महिन्यांच्या खात्यावरती चौथा आणि पाचव्या हप्त्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. पण आता जास्त महिलांना खुश होण्याची गरज नाही कारण की बऱ्याचशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. आणि या अपात्र यादीमध्ये तुमचं तर नाव नाही ना ते अगोदर तपासून घ्यायचं आणि मगच तुम्हाला आनंद साजरा करता येणार आहे.
या महिला ठरणार आहेत अपात्र
ज्या महिलांच्या वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा महिलांना किंवा त्याच कुटुंबातील महिलेला या योजनेचा लाभ मिळणार आहे.
ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असणार आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे लाभार्थी ज्यांनी अगोदर नोंदणी केली आहे आणि मागील हप्त्याची रक्कम त्यांना मिळालेले आहे त्यांनाच पुढील लाभ देखील मिळणार आहे.
मूळ महाराष्ट्रातील महिलांना याचा लाभ मिळणार आहे कारण की इथून पुढे आता पडताळणी सुरू होणार आहे.
लाभार्थी महिलेचे वय 21 ते 65 वयाच्या दरम्यान असावे. लाभार्थी महिलेचे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
बँक खात्याशी आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे नसेल तर लवकरात लवकर लिंक करून घ्या.
लाभार्थी महिलेच्या कुटुंबातील कोणीही शासकीय नोकर नसावा किंवा पेन्शनधारक नसावा.