Sukanya Samriddhi Yojana: पुढच्या महिन्यात सुकन्या समृद्धी योजनेमध्ये होणार मोठा बदल, हे काम नाही केलं तर होणार अकाउंट बंद !

सुकन्या समृद्धी योजना ही एक मुलींच्या उज्वल भविष्यासाठी असलेली योजना आहे या योजनेमध्ये एक ऑक्टोबर पासून काही नियमांमध्ये बदल होणार आहे.
जर तुमच्या पण घरी सुकन्या चे खाते आहे तर हा लेख ध्यान देऊन पूर्ण वाचा.

📢मुलीच्या भविष्याची काळजी करण्याची गरज नाही शिक्षणापासून ते लग्नापर्यंत सरकार या योजनेअंतर्गत करणार खर्च. पाहा येथे 👈🏻✅

सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांमधील नवीन बदल

Sukanya Samriddhi Yojana New Rule Update : नवीन नियमांच्या आधारे सुकन्या योजना चे अकाउंट ला फक्त पेरेंट्स ऑपरेट करू शकतात. जर तुमच्या मुलीने सुकन्या अकाउंट हे ओपन केलेले असेल जे की कायदेशीर पालक नाही तर तुम्हाला लवकरात लवकर हे अकाउंट ट्रान्सफर करावे लागणार आहे.

जर तुम्ही हे अकाउंट ट्रान्सफर नाही केले तर अकाउंट हे बंद होऊ शकते. हा नवीन नियम एक ऑक्टोबर 2024 पासून लागू होणार आहे.

सुकन्या समृद्धी योजना

सुकन्या समृद्धी योजना ही 2015 ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बेटी पढाव बेटी बचाव या अभियाना अंतर्गत ही योजना सुरू केली होती. या योजनेच्या अकाऊंट वरती पेरेंट्स हे सेविंग साठी आपल्या मुलीच्या उज्वल भविष्याकरिता रक्कम जमा करतात व या रकमेवर सरकारद्वारे उच्च व्याज मिळते.

सुकन्या समृद्धी योजना चे फायदे ( benefits of Sukanya samriddhi Yojana )

  • या योजनेच्या खात्यात वार्षिक रक्कम कमीत कमी 250 रुपये ते दीड लाख रुपयांपर्यंत आपण सेविंग करू शकतो.
  • जर तुमच्या दोन मुली असतील तर तुम्ही त्यांच्यासाठी प्रत्येकी खाते ओपन करू शकता.
  • या योजनेत गरज भासल्यास मुदत वेळेपूर्वी पैसे काढण्याची सुविधा ही उपलब्ध आहे.

तर तुम्हीही सुकन्या योजनेमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर या योजने संबंधित सर्व नियम हे काळजीपूर्वक वाचले पाहिजेत.