Good News For Anganvadi Sevika अंगणवाडी सेविकांना आणि मदतनिसांना आता मिळेल जास्त भत्ता आणि मानधन, वाचा सविस्तर माहिती.

Good News For Anganvadi Sevika नमस्कार मित्रांनो, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना आता चांगल्या प्रकारे भत्ता आणि मानधन देखील मिळणार आहे ते कशा पद्धतीने मिळणार आहे ते आज आपण या पोस्टच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत. केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे मिशन शक्ती मधील सामर्थ्य कार्यक्रमांतर्गत राज्यात अंगणवाड्यामध्ये पाळणा योजना सुरू करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. त्यानुसार संबंधित अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना भत्ता आणि तसेच पाळणा सेविका आणि पाळणा मदतनीस यांना सुद्धा भत्ता देण्यात येणार आहे. सुरुवातीला 345 पाळणाघरे सुरू करण्यात येणार आहेत केंद्राकडून येणाऱ्या मागणीप्रमाणे पुढे अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

हे पण वाचा, गृहिणींसाठी मोठी खुशखबर..!! दिवाळीपूर्वी एलपीजी सिलिंडर 300 रुपयांपर्यंत स्वस्त

या योजनेअंतर्गत प्रत्येक पाळण्यासाठी पाळणा सेविका आणि पाळणा मदतनीस यांचे प्रत्येकी एक पद तयार करण्यात येत आहे. या योजनेसाठी वार्षिक खर्च तीन लाख 35 हजार इतका येणार आहे तसेच या खर्चासाठी केंद्र सरकारचा हिस्सा राहणार आहे तसेच राज्याचाही साचाळीस टक्के राहणार आहे. केंद्र सरकारकडून मिळालेल्या सूचनाप्रमाणे पाळणा घराणांसाठी आवश्यक साहित्य, पूर्व शालीय शिक्षण घटक संच, अतिरिक्त पूरक पोषण आहार, पाळणा भाडे, औषधी संच, खेळाचे सर्व साहित्य, संबंधित अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना भत्ता तसेच पाळणा सेविका आणि पाळणा मदतनीस यांचे मानधन देण्याकरिता मासिक तसेच वार्षिक खर्च अनुज्ञेय करण्यात आलेला आहे. पाळणा उभारणी करिता खर्च एक वेळेचा 50 हजार रुपये इतका राहणार आहे. आता मानधन आणि भत्ता कशा पद्धतीने मिळणार आहे.? हे देखील जाणून घेऊ.

अशा पद्धतीने मिळणार भत्ता आणि मानधन

पाळणा घरामधील अंगणवाडी सेविकांना मासिक भत्ता 1500 रुपये मिळणार आहे, पाळणा घरामधील अंगणवाडी मदतनीसंना मासिक भत्ता 750 रुपये मिळेल, पाळणा सेविकांना मासिक मानधन 5500 मिळणार आहे. तसेच अतिरिक्त पोषण आहार अंतर्गत 25 लाभार्थ्यांना 4375 रुपये मिळणार आहेत. पूर्व शालेय शिक्षण घटक संच 625 रुपये आणि इतर खर्च तेराशे रुपये मिळेल तसेच पाळणा भाडे महानगरक्षेत्रांमध्ये 12 हजार रुपये आणि महानगर क्षेत्र वगळता 8000 रुपये, पाळण्यातील साहित्य खेळाचे साहित्य 10 हजार रुपये आणि औषधी संच 1,000 रुपये असा खर्च सरकारने अनुज्ञेय केलेला आहे.

Leave a Comment