Grampanchayat Yojana Yadi नमस्कार मित्रांनो, आपल्या गावामधील ग्रामपंचायत मध्ये ज्या ज्या योजना येतात त्या योजनांच्या लाभार्थ्यांची यादी किंवा कोणत्या योजना आलेले आहेत हे कशा पद्धतीने पाहायच आहे.? हे आज आपण जाणून घेणार आहोत. ग्रामपंचायत लाभार्थी यादी पहायला आपल्याला पंचायत समितीमध्ये किंवा ग्रामपंचायत मध्ये जाण्याची गरज नाही कारण की आपण घरबसल्या ऑनलाईन मोबाईल वरती फक्त पाच मिनिटांमध्ये ग्रामपंचायत मधील योजनांची यादी तसेच लाभार्थ्यांची यादी पाहू शकणार आहोत.
अशा पद्धतीने पहा ग्रामपंचायत योजना लाभार्थी यादी
1) ग्रामपंचायत च्या वेगवेगळ्या योजनांच्या लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन पाहण्यासाठी सर्वात अगोदर या 👉https://nrega.nic.in/Homepanch_new.aspx वेबसाईट ला आपल्याला भेट द्यावी लागणार आहे.
2) वेबसाईट ओपन झाल्यानंतर पंचायत या ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे.
3) त्यानंतर आपल्याला पुढील पेज वरती ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा पंचायत हे ऑप्शन दिसतील त्यामधील ग्रामपंचायती या ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे.
4) ग्रामपंचायत ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर त्यामध्ये जनरेट रिपोर्ट हा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करा.
5) आता पुढे आपल्याला राज्य कोणचा आहे ते निवडायचा आहे त्यावरती महाराष्ट्र नावावरती आपलं क्लिक करायचं आहे.
6) राज्य निवडल्यानंतर आपल्याला कुठल्या वर्षाची यादी पाहिजे ते वर्ष निवडून नंतर आपला जिल्हा तालुका आणि गावाचे नाव निवडून प्रोसेस या बटणावरती क्लिक करायचं आहे.
7) आता आपल्याला ग्रामपंचायत रिपोर्ट्स मध्ये वेगवेगळे पर्याय दिसणार आहेत यामध्ये योजनेची माहिती पाहिजे या ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे.
8) आता आपल्याला येथे R5 RPPE या टॅब मध्ये लिस्ट ऑफ वर्क या ऑप्शन वरती क्लिक करून ग्रामपंचायत ची योजना लाभार्थी यादी पाहता येणार आहे.