Kapus Soybean Anudan Yadi नमस्कार मित्रांनो, कापूस सोयाबीन अनुदान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान शासनाकडून देण्यात येत आहे आणि याच संदर्भात महाराष्ट्र सरकारने एक शासन निर्णय सुद्धा जाहीर केलेला आहे. सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5000 याची मर्यादा ही दोन हेक्टर पर्यंत आहे म्हणजेच पात्र शेतकरी बांधवांना जवळपास दहा हजार रुपये या योजनेअंतर्गत देण्यात येत आहेत. त्या अनुदान कशा पद्धतीने वाटप करण्यात येणार आहे आणि त्याच लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे ही संपूर्ण माहिती आज आपण या पोस्टद्वारे जाणून घेत आहोत.
हे पण वाचा, जमीन विकत घेताना या गोष्टींची काळजी नक्की घ्या.?
सोयाबीन आणि कापूस उत्पादन योजनेसाठी कोणते लाभार्थी पात्र असणार आहेत या संदर्भाची यादी ऑनलाईन जाहीर करण्यात आलेली आहे आणि या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर आपल्याला हे अनुदान नक्कीच मिळणार आहे. त्यासाठी कापूस सोयाबीन अनुदान यादी पाहणे आवश्यक आहे. खाली दिलेल्या पद्धतीने तुम्ही कापूस सोयाबीन अनुदान यादी पाहू शकता.
कापूस, सोयाबीन अनुदान यादी अशा पद्धतीने पाहायची.
सर्वात अगोदर आपल्याला या 👉https://uatscagridbt.mahaitgov.in/ संकेतस्थळावर भेट द्यायची आहे.
जर आपण वेबसाईट ओपन केली आहे तर आपल्या समोर कृषी विभाग आणि महाराष्ट्र शासन या संदर्भात काही माहिती दिसणार आहे.
या ठिकाणी आपल्याला तीन ऑप्शन्स दिसणार आहेत त्यापैकी शेवटचा ऑप्शन म्हणजेच फार्मर सर्च या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे.
या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर एक पेज निर्माण होईल हे पेज लॉगिन फार्मऱ असे असणार आहे.
आता या पेजवर आल्यानंतर आपल्याला हे आपला आधार क्रमांक प्रविष्ट करायचा आहे आणि गेट ओटीपी या ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे.
जो मोबाईल नंबर आधार कार्ड ची लिंक असणार आहे त्या मोबाईलवरील आलेला ओटीपी या चौकटीमध्ये टाकून वेरीफाय करायचा आहे.
संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आपल्याला शेतकऱ्यांची कापूस सोयाबीन अनुदान यादी दिसेल या यादीमध्ये आपल्याला आपले नाव पाहायचे आहे.