Ladki Bahin Scheme Payment नमस्कार मित्रांनो, राज्य सरकार अंतर्गत महिलांसाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या अकाउंट वरती पंधराशे रुपयांचे मदत दिली जाणार आहे. आतापर्यंत एकूण दोन टप्प्यांमध्ये पात्र महिलांना पैसे मिळालेले असून आता तिसरा टप्प्याचे वाटप कधी होणार आहे याचीच वाट सर्व लाडक्या बहिणी पाहत असून याची तारीख देखील जाहीर झालेली आहे.
हे पण वाचा, “या” विद्यार्थ्यांना मिळणार ६ हजार ५०० रुपये, आजच करा अर्ज.
29 सप्टेंबर 2024 रोजी येणार पैसे..
असे असतानाच लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांना दिनांक 29 सप्टेंबर 2024 या दिवशीपासून डीबीटी पद्धतीने सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे पाठवण्यात येणार आहेत. अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे.
सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची आढावा बैठक मंत्रालयामध्ये आयोजित करण्यात आलेली होती आणि दिनांक २९ सप्टेंबर 2024 या दिवशी रायगड जिल्ह्यामधील माणगाव तालुक्यामधील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच राज्यस्तरीय कार्यक्रम होणार होता. या कार्यक्रमाच्या नियोजन संदर्भामध्ये आढावा घेण्यात आला. व्यासपीठाचे व्यवस्थापन, कायदा आणि सुरक्षा, संस्कृती कार्यक्रम, कार्यक्रम स्थळी पार्किंगची व्यवस्था, पिण्याचे पाणी, लाभार्थ्यांची यशोगाथा याबद्दलच्या महत्त्वपूर्ण सूचना मंत्री अदिती तटकरे यांनी येथे दिल्या.