ladki bahin yojana money credited : महाराष्ट्र सरकारने भरपूर महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा केले आहे.
भरपूर महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये आता जमा झालेले आहेत तर बऱ्याचश्या महिलांच्या खात्यावरती आणखीन तीन हजार रुपये जमा झालेले नाहीत तर का जमा झाले नाहीत यासाठी तुम्ही काय करावे याबद्दल आपण पुढे जाणून घेऊया.
हे पैसे तुम्हाला 17- 20 ऑगस्ट या रोजी मिळणार आहेत कारण 27 लाख महिलांचे जे काही आधार कार्ड आहेत ते बँकेला लिंक नसल्यामुळे भरपूर जणांच्या मोबाईल वरती असा सुद्धा मेसेज आलेला आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी ही योजना अंतर्गत आपला अर्ज प्राप्त झालेला आहे, परंतु आपले बँक खाते आपल्या आधारशी संलग्न नाही यासाठी आपण तात्काळ बँकेला भेट देऊन आपले खाते आधारशी संलग्न करून घ्यावे.
म्हणजेच आधार डीबीटी करून घेणे. आधार कार्ड लिंक करून घ्यावे .
आधार कार्ड कशाप्रकारे लिंक असणे गरजेचे आहे
आधार कार्ड हे बँकेला डीबीटीसीडिंग असणे गरजेचे आहे.
डीबीटी (DBT) चा अर्थ असा आहे (direct benefit transfer).
- तुमच्या आधार कार्ड जर डीबीटीला सीडिंग असेल तरच तुमच्या खात्यात पैसे जमा होतील. नसता तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- अधिकतर लोकांचे असे मत आहे की, माझे आधार कार्ड हे बँकेला लिंक आहे.
पण लिंक असून तुमचे आधार कार्ड हे बँकेला डीबीटी सिडींग नाही.
आधार कार्ड बँकेला डीबीटी सीडिंग लिंक आहे की नाही
हे कसे चेक करावे ?
- तुम्हाला my.uidaiadhar.gov.in वर जायच आहे.
- वेबसाईट वरती आल्यानंतर तुम्हाला आधार नंबर टाकून लॉगिन करायचा आहे.
- लॉगिन केल्यानंतर तुमच्या आधार कार्ड ला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या नंबर वरती एक ओटीपी येईल तो इथे भरायचा आहे. व सबमिट बटनावर क्लिक करायच आहे.
- तिथे तुम्हाला काही ऑप्शन्स दिसतील, त्यातून तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस (Bank seeding status) या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे.
त्यानंतर तुम्हाला तिथे पहावयास मिळेल की तुमचे आधार कार्ड हे कोणत्या बँक खात्याला डीबीटी लिंक आहे. - आणखी महत्त्वाची गोष्ट इथे तुम्हाला जी काही बँक दिसेल तिचा स्टेटस हे तुम्हाला ॲक्टिव्ह Active असणे गरजेचे आहे.
जर तुमचेअकाउंट स्टेटस ऍक्टिव्ह (Active) असेल तर तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही. तुम्हाला 17-20 तारखेला तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील. म्हणजेच आज भेटतील किंवा उद्या भेटतील.
- पैसे तुम्हाला शंभर टक्के मिळून जातील फक्त तुमचे डीबीटी लिंक असणे गरजेचे आहे.
लाडकी बहिण योजना 2024 चे पैसे हे कोणत्या खात्यात येणार आहे. आधार क्रमांक द्वारे येथे करा चेक ?
कोणतीही बँक दिसत नाही / Inactive स्टेटस दर्शवत असेल तर काय करावे ?
जर तुम्हाला कोणतेही डिटेल्स मध्ये बँक खाते दिसत नसेल किंवा तुमचे स्टेटस हे Inactive येत असेल तर तुम्हाला लगेच पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन आणि एक IPPB (Indian Post payment Bank) चे डिजिटल अकाउंट उघडून घ्यायच आहे.
जेणेकरून तुम्हाला तुमचे येणारे पैसे हे पोस्ट ऑफिस अकाउंट वरती येऊन जाईल.
बरेचसे महिलांनी फॉर्म भरता वेळेस हे पोस्ट बँकेचे अकाउंट न देता दुसऱ्या बँकेचे अकाउंट दिलेले आहे.
इथे बँक अकाउंटचा काही प्रॉब्लेम नाहीये तुमच्या आधार कार्ड ला जे बँक अकाउंट लिंक असेल. व ऍक्टिव्ह दाखवत असेल त्या अकाउंटला डायरेक्ट पैसे येऊन जातील.