Land Purchase News नमस्कार मित्रांनो, तुम्ही बऱ्याचदा ऐकले असेल किंवा वाचले असेल तसेच न्यूजमध्ये पाहिली असेल की शेतजमीन विकत घेत असताना कोणाची तरी फसवणूक झालेली आहे. अशाच प्रकरणांमध्ये जास्तीत जास्त करून एकच जमीन एकापेक्षा जास्त नागरिकांना विकणे तसेच जमीन कोणाच्या मालकीच्या आहे आणि दुसराच व्यक्ती त्याची विक्री परस्पर करतो आहे असे फसवणुकीचे प्रकार आपल्याला दिसून आलेले आहेत.
हे पण वाचा, खाद्यतेलांच्या दरामध्ये पुन्हा एकदा झाली वाढ, पहा प्रति किलोचा दर काय आहे.?
तसेच मित्रांनो असा प्रकार आपल्या सोबत झाला तर लाखो रुपयांची नुकसान होणार आहे. आणि आपण बरेचसे पैसे देऊन सुद्धा जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार करत असताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक गोष्ट आहे. नाहीतर लाख रुपये खर्च करून सुद्धा मानसिक त्रासाला आपल्याला समोर जाऊन लागू शकत असणार आहे. त्यामुळे आपण या पोस्टमध्ये काही छोट्या पण महत्त्वपूर्ण गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत जेणेकरून आपण कुठे शेत जमीन विकत घेत असू त्यामुळे अशा व्यवहारांमध्ये आपली फसवणूक होणार नाही आणि कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे.? या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत.
शेतजमीन विकत घेताना या गोष्टींची घ्या काळजी.
सातबारा उतारा सविस्तर तपासून घ्यावा – सातबारा उतारा म्हटलं तर जमिनीचा आरसा एक प्रकारे आपण याला म्हणतो आणि हाच सातबारा उतारा जमीन खरेदी विक्री व्यवहारामध्ये मुख्य दस्ताऐवज असतो. त्यामुळे आपण ज्या नागरिकाकडून शेतजमीन विकत घेत आहोत त्या नागरिकाचे नाव सातबारा उताऱ्यावर आहे की नाही हे पाहावे किंवा त्या सातबारावर इतर कोणाची नावे आहेत ते सुद्धा आपण व्यवस्थित तपासून पाहणे गरजेचे आहे. तसेच या व्यतिरिक्त या सातबारे वरती कोणत्या बँकेचे कर्ज गहाण खत नाही हे सुद्धा चेक करायला हवे.
जमिनीचा नकाशा पहा – आपण जी शेतजमीन खरेदी करणार आहोत ती कुठून कुठपर्यंत आहे.? हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे त्यासाठी आपल्याला जमिनीचा नकाशा पहावा लागणार आहे. आपल्याला ज्या गटामधील शेतजमीन खरेदी करायची आहे त्या गटाचा नकाशा सविस्तर पाहून घ्यावा. नकाशात जमीन दाखवल्याप्रमाणे तशी शेत जमीन आहे की नाही हे देखील चेक करून घ्यावे. तसेच त्या जमिनीच्या तुलसीना म्हणजेच चारही बाजूंना कोणत्या गट नंबरची शेती आहे हे देखील आपल्याला माहिती करावी लागेल.
शेत रस्त्याची माहिती घ्या – शेतजमीन खरेदी करताना अशी जमिनी साठी रस्ता कुठून आहे हे पाहणे देखील खूपच गरजेचे आहे आणि कुठलीही जमीन आपण खरेदी करत असताना जमिनीमध्ये येण्या जाण्यासाठी क्षेत्र असता कशा पद्धतीचा आहे हे देखील पहावे लागणार आहे जेणेकरून पुढील गोष्टींसाठी आपल्याला अडचणी येणार नाही. बऱ्याचदा आपण शेत जमीन खरेदी करतो पण या शेतजमिनींना रस्ता नसतो आणि दुसऱ्याच्या जमिनीमधून रस्ता केला तर यामुळे कायदेशीर समस्या किंवा कौटुंबिक वाद आपण म्हणतो हे निर्माण होऊ शकणार आहेत.
तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही कुठे शेतजमीन खरेदी करणार असाल तर या सर्व गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही.. माहिती आवडल्यास इतरांना शेअर करा…