Mazi Ladki Bahin Installment महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र झालेल्या महिलांच्या खात्यामध्ये दरमहा 1500 रुपये जमा करण्यात येणार आहेत. तसेच या योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांच्या बँक खात्यावर येणाऱ्या 17 तारखेला 3 हजार रुपये शासनाकडून जमा करण्यात येणार आहेत. यासाठी अर्जांची छाननी एकदम युद्ध पातळीवर सुरू असून आतापर्यंत राज्य सरकारकडे जवळपास करोडो महिलांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज सुद्धा केलेली आहेत. सर्व महिलांनी या योजनेमध्ये अर्ज हे मोबाईल ॲप्लिकेशनच्या मदतीने आणि नंतर अधिकृत वेबसाईट पोर्टल वरती अर्ज दाखल केलेले आहेत.
लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर झाली, इथून करा डाऊनलोड
याच दरम्यान छाननी झालेल्या नंतर महिलांच्या अर्जावर वेगवेगळ्या सूचना दाखवल्या जात असून काही महिलांचे अर्ज अजून सुद्धा प्रिंटिंग दाखवत आहेत तर काही महिलांच्या अर्जाची स्थिती अप्रुड असे सुद्धा दाखवत आहे. या सर्व स्थितींची अर्थ आपल्याला आज या पोस्टमध्ये समजून घ्यायचा आहे आणि नेमकं कोणत्या महिलांना पैसे येणार आहेत.? हे देखील आपल्याला पाहायचं आहे.
अर्जावर 4 वेगवेगळ्या सूचना आहेत त्यांचा अर्थ काय
अर्ज आपण दाखल केला तर आपल्या अर्जावर जवळपास चार सूचनांपैकी कोणतीही एक सूचना आपल्याला दिसणार आहे. या सूचनेप्रमाणे आपला अर्ज मंजूर झालेला आहे का.? तुमच्या खात्यामध्ये 17 तारखेला पैसे येणार आहेत की नाही.? हे समजणार आहे.
Disapproved म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊया
लाडकी बहीण योजनेचा लाभ आपल्याला घ्यायचा असेल तर या योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर आपल्याला जायला हवं. त्यानंतर तिथे डीस अप्रोड झालेल्या अर्जांना पुन्हा एकदा अर्ज दाखल करण्याचा पर्याय आपल्याला दिसणार आहे. डिस आप्रॉड या सूचनेच्या खाली एडिट हा पर्याय आपल्याला दिसणार आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या अर्जात जी चूक झालेली आहे ती दुरुस्त करण्यासाठी पुन्हा एकदा संधी मिळणार आहे त्यानंतर तुम्ही अर्ज भरून सबमिट पुन्हा करू शकता.
Pending To Submitted म्हणजे नेमकं काय आहे.?
ज्या महिलांचा फॉर्म रिजेक्टेड लिस्ट मध्ये किंवा रिजेक्टेड असे दाखवत आहे असा ऑप्शन त्यांना दिसला तर तुमचा अर्ज बाद आहे असे समजावे. तसेच या महिलांना पुन्हा अर्ज करण्याची सध्यातरी संधी या वेबसाईट वरती दिलेली नाही. ज्यांच्या अर्जासमोर Pending To Submitted असे ऑप्शन दिसत आहे त्या महिलांनी पुढे काहीही करायचे नाही. असा ऑप्शन दिसला तर आपला अर्ज शासनाकडे सबमिट झालेला असून आपला फॉर्म चेक करण्यात येत आहे असे समजावे.
In Review म्हणजे नेमकं काय आहे.?
ज्या महिलांचा अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्या अर्जापुढे इन रिव्ह्यू असे दाखवले जात आहे त्या महिलांना घाबरण्याची कसलीही कारण नाही. या ऑप्शन चा अर्थ असा आहे की सरकारी अधिकाऱ्यांकडून आपल्या अर्जाचा व्हेरिफिकेशन अर्थातच छाननी सुरू आहे असा होत आहे. त्यामुळे आपला अर्ज मंजूर झाला आहे की बाद झाला आहे हे नंतर आपल्याला समजणार आहे.
Approved चा अर्थ नेमकं काय आहे.?
ज्या महिलांनी अर्ज केलेला आहे आणि त्यांच्या अर्जासमोर Approved असा ऑप्शन दिसलेला आहे. याचा अर्थ असा आहे की तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे आणि याच महिलांच्या खात्यामध्ये येणाऱ्या 17 ऑगस्ट या दिवशी 3 हजार रुपये हस्तांतरित केले जाणार आहेत.
महिलांना मोफत मिळणार आहे शिलाई मशीन, केंद्र सरकारची आहे खास योजना.!!