Pm Kisan yojna: शेतकऱ्यांसाठी खुशखबर नमो किसान महासन्मान योजनेचा हप्ता आजच जमा होणार 2000रू.
PM KISAN YOJANA / पी एम किसान योजना
राज्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत तीन हजार रुपये जमा झाले असतानाच लवकरच शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 2000रू. रुपये हप्ता लगेचच जमा होणार असल्याची शासनाकडून माहिती मिळालेली आहे.
एकूणच शेतकऱ्यांच्या एका कुटुंबामध्ये लाडकी बहीण व पी एम किसान योजनेअंतर्गत पाच हजार रुपये मदत शासनाकडून जमा होणार असल्याची वृत्त जाहीर झालेले आहे. कृषी महोत्सव परळी येथे कृषी मंत्र्यांच्या हस्ते या पैशाचे वितरण एक कोटी शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या सोयाबीन व कापूस पिकाचे अनुदान देण्यासाठी चालू केलेल्या पोर्टलचे अनावरण ही यावेळी करण्यात येणार आहे. लाडकी बहिण नंतर pm किसान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून मदत देण्याचे काम करत असलेले पाहावयास मिळत आहेत.
शेतकरी कुटुंबास आर्थिक पाठबळ मजबूत करण्यासाठी सरकारने पी एम किसान सन्मान निधी योजना राबवलेली आहे ( pm Kisan Samman Nidhi) या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये या योजने अंतर्गत प्रत्येक चार महिन्याच्या अंतराने 2000रू रुपये शेतकऱ्यांच्या खात्याला जमा होतात. आतापर्यंत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 17 हप्ते जमा झालेली आहेत.
योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ही माहिती तपासा 🔴
या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्जामध्ये नमूद केलेले
- आपले नाव
- आधार क्रमांक
- खाते क्रमांक
- लिंग
यासारख्या गोष्टी व्यवस्थित तपासून भराव्यात. या शेतकऱ्यांच्या जमिनीची पडताळणी अद्याप झालेली नाहीये अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
या योजने संदर्भातील माहिती:
या योजने बद्दलची सविस्तर माहिती तुम्ही खालील वेबसाईट लिंक वर क्लिक करून मिळवू शकता.
🔴अधिकृत वेबसाईट लिंक🔴
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
ज्या शेतकऱ्यांचे केवायसी झालेली नाहीये अशा शेतकऱ्यांनी जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
- या संदर्भात काही अडचण निर्माण होत असेल तर टोल फ्री क्रमांक-155261 ची मदत घेऊ शकता.
- Pm Kisan yojna संबंधित तपशील जाणून घेण्यासाठी शेतकरी 1800115526 या क्रमांकावरील संपर्क करू शकतात.
पी एम किसान योजना अंतर्गत मिळणाऱ्या दोन हजार रुपये या योजनेबद्दल सविस्तर माहिती संदर्भातील अडचणी दूर करण्यासाठी टोल फ्री क्रमांक तसेच वेबसाईट बद्दल माहिती दिलेली आहे अर्जातील त्रुटी नावाचा व्यवस्थित अर्ज दाखल करण्यासाठी आपले सविस्तर बँक डिटेल व आधार क्रमांक या सर्व बाबी विषय आपण या लेखाद्वारे सविस्तर माहिती दिलेली आहे.