एन दिवाळीमध्ये लाल परी चा प्रवास महागला, तिकीट दरामध्ये झाली 10 टक्क्यांनी वाढ, प्रति 6 किलोमीटर साठी मोजावे लागतील इतके पैसे.?

ST Bus Ticket Rate नमस्कार मित्रांनो, एन दिवाळीमध्ये लाल परीच्या तिकीट दरामध्ये दहा टक्क्यांनी वाढ झालेली असून आता प्रतिसाद किलोमीटरसाठी पैसे मोजावे लागणार आहेत हे आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे. मित्रांनो आता दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली असून दिवाळीसाठी नातेवाईकांकडे किंवा सुट्टीवर घेऊन घराकडे जाण्यासाठी प्रवाशांची आणि सर्वांची लगबग झालेली असते. गाव खेड्यामध्ये प्रवासाचे सुरक्षित साधन आपण एसटीला समजत असतो. पण आता एन दिवाळीच्या या सणामुळे एसटीचा प्रवास महाग झालेला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एका महिन्याच्या कालावधीसाठी प्रवासी भाड्यामध्ये 10 टक्क्यांनी वाढ केलेली आहे. शिवनेरी ही बस वगळता इतर सर्व प्रकारच्या बसेस साठी 25 ऑक्टोबर पासून ही दरवाढ लागू होणार आहे.

हे पण वाचा, लाडकी बहीण योजनेचे पुन्हा एकदा नवीन अर्ज भरणे सुरू

एसटी महामंडळ कडून निम आराम, साधी, शयन असनी, शयन, वातानुकूलित, शिवाई, शिवशाही आणि शिवनेरी, या बसची ही भाडेवाढ केली आहे. एक महिन्याकरिता ही भाडेवाढ कायम राहणार असून हा हंगाम संपल्यानंतर म्हणजेच 26 नोव्हेंबर पासून भाडे पूर्वपदावर येणार आहेत. सध्या मिळालेल्या माहितीनुसार सहा किलोमीटरचा एक टप्पा असणार आहे त्यानुसार साध्या बसचे भाडे 8 रुपये 70 पैसे असणार आहे. त्यामध्ये दहा टक्के वाढ झाली असून आता 9 रुपये 55 पैसे प्रति सहा किलोमीटर साठी भाडे मोजले जाणार आहे. आता पूर्ण भाडेवाढ कशी होणार आहे हे खाली आपण जाणून घेऊया.

अशी असेल भाडेवाढ

1) साधी आणि जलदचे तिकीट सध्या प्रति टप्पा (६ किमी) ८.७० रुपये आहे. १० टक्के भाडेवाढ धरून ती ९.५५ रुपये होईल.

2) निमआराम, स्लिपर ११.८५ वरून १३.०५ रुपये होईल.

3) ई बसचे तिकीट सध्या १२.३५ रुपये आहे ते १३.६० रुपये होईल.

4) शिवाई व शिवशाहीचे तिकीट २२.३५ वरून १३.६० होईल.

5) शिवनेरीचे तिकीट १२.९५ वरून १४.२५ रुपये होईल.

Leave a Comment