महिलांना मिळणार महिन्याला ₹ 1500 रुपये | मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना 2024

मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजना 2024

महिला व पुरुष समानता हे सक्षम करणे एक विकास ध्येय आहे .महिलांना राजकीय , सामाजिक ,आर्थिक याची संधी उपलब्ध करण्यासाठी विविध धोरणे, कार्यक्रम, योजना राबविण्यात येत आहेत. हेच राज्य शासनाने 7 मार्च ला महिलांसाठी चौथे धोरण ही जाहिर केले गेले आहे.
याच प्रमाणे जाहीर केलेल्या योजनांपैकी माझी लाडकी बहीण योजना ही जाहीर केली.

[table id=6 /]

[table id=7 /]

या योजनेत शासन दरवर्षी 46000 कोटी इतका रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार आहे.

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात निवेदन करू इच्छितो:

1. सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक. 1 july 2024 – 15 july 2024 पर्यंत होती.पण आता यात मर्यादित सुधारणा करण्यात आल्या होत्या आता मुदत ही 2 महिने ठेवण्यात आली आहे.

जी की 31 ऑगस्ट, 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. ज्या ज्या महिलांनी दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज केला तर त्या महिलांना दिनांक. 01 जुलै 2024 पासून दरमहा रुपये 1500 आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.

2. या योजनेसाठी पात्र होण्यासाठी आदिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे असे नमूद करण्यात आलेले होते. आता लाभार्थी महिला कडे आदिवासी प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी 15 वर्षांपूर्वीचे 1 राशन कार्ड , 2 मतदार ओळखपत्र , 3 शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र , 4. जन्म दाखला यापैकी कोणतेही प्रमाणपत्र किंवा ओळखपत्र हे ग्राह्य धरण्यात येतील.

3. या योजनेत जी पाच एकरची शेतीची अट होती ती आठ वगळण्यात आली आहे.

4. या योजनेत ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांचे वयोगट हे 21 ते 60 वर्ष होते पण आता त्याऐवजी 21 वर्ष ते 65 वर्ष एवढे वयोगट करण्यात आले आहे.

५. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे १. जन्म दाखला २. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ३. आधिवास प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल.

६. रु.२.५ लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात येत आहे.

७. सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

 

[table id=5 /]

Leave a Comment