अमृत योजना / Amrut Yojana
कोणत्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार:
जे विद्यार्थी खुल्या व प्रवर्गातील व ज्या विद्यार्थ्यांना कुठल्याही शासकीय विभाग किंवा संस्था महामंडळ यांना मार्फत समकक्ष योजनेचा लाभ मिळत नसेल तर अशा खुल्या प्रवर्गातील गटातील विद्यार्थी जे आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत व विद्यार्थ्यांनी राज्य परीक्षा चे बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा व ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत अशा उमेदवारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
म्हणजेच थोडक्यात सांगायचे तर जे विद्यार्थी ओपन कॅटेगिरी चे आहेत आणि ज्यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासकीय संघटक असलेला बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा व ऑनलाईन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत. अशा उमेदवारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
यावरून एक स्पष्ट होते की जे उमेदवार फक्त ओपन प्रवर्गातील आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे,
आणि बाकी मागास प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
तसेच अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ज्या उमेदवारांनी 2024 या वर्षामध्ये कोर्स पूर्ण केलेले असतील, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे व ज्या उमेदवारांनी 2024 पूर्वी कोर्स पूर्ण केलेले असतील, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
प्रधानमंत्री आवास योजनेची नवीन यादी आली, “या” यादीमध्ये नाव असेल तर मिळणार ०१ लाख २० हजार रुपये पर्यंत आर्थिक मदत.✅
पात्रता:
- उमेदवाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे आठ लाखांपेक्षा कमी असावे.
- वरील सांगितल्याप्रमाणे या योजनेचा लाभ मिळवण्याकरिता उमेदवाराने कोर्स 2024 या वर्षांमध्ये पूर्ण केलेला असावा कारण त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
टायपिंग कोर्स अमृत योजना संपूर्ण माहिती
ज्या विद्यार्थ्यांने किंवा उमेदवाराने महाराष्ट्र राज्य उमेदवार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासकीय संगणक टंकलेखन
याचे बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा जेकी GCC ,TBC म्हणजेच कम्प्युटर टायपिंग मराठी, हिंदी व इंग्रजी यात 30 व 40 एवढे शब्द प्रति मिनिट उत्तीर्ण होतील त्या उमेदवारांना रक्कम 6500/- रुपये मिळणार आहे.
तसेच जे उमेदवार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची ऑनलाईन लघुलेखन परीक्षेत म्हणजेच मराठी व हिंदी या टायपिंग मध्ये 60 80,100 व 120 एवढे शब्द प्रति मिनट व इंग्रजी टायपिंग 60 80, 100, 120, 130, 140 ,150 व 160 एवढे शब्द प्रति मिनिट या वेगाची असलेली परीक्षा ही उत्तीर्ण होतील त्या उमेदवारांना रक्कम 5300/- रुपये मिळणार आहेत.
आणि ही रक्कम तुम्हाला तुमचे बँक खाते च्या आधार कार्ड ला लिंक असेल त्या खात्यामध्येच थेट जमा होणार आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: | 30 सप्टेंबर 2024 |
आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- जातीचा दाखला किंवा प्रमाणपत्र ( EWS प्रमाणपत्र )
- दहावी व बारावीची मार्कशीट
- बँकेचे पासबुक
- पासपोर्ट साईज फोटो
- शाळा सोडल्याचा दाखला ( Leaving Certificate )
- डोमासाईल सर्टिफिकेट
- तुम्ही उत्तीर्ण केलेल्या कोर्सचा रिझल्ट असणे आवश्यक आहे.
- केलेल्या कोर्सच्या असलेल्या फीस पावत्या असणे आवश्यक आहेत.
- व चालू मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी आवश्यक आहे.
ऑनलाइन फॉर्म कसा भरावा?
AMRUT Yojana Online Application
- सर्वप्रथम तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून त्या वेबसाईट वर तुम्हाला हा फॉर्म भरा भरायचा आहे.
👉🏻अधिकृत वेबसाईट लिंक: www.mahaamrut.org.in
- फॉर्म भरल्यानंतर त्या फॉर्मची प्रिंट तुम्हाला काढून घ्यायची आहे.
- व त्यासोबत सांगितलेले सर्व डॉक्युमेंट हे फॉर्म प्रिंट सोबत खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहे.
- पत्ता :- व्यवस्थापकीय संचालक,
(महाराजा सयाजीराव गायकवाड उद्योग भवन, मजला पाचवा , औंध, पुणे- 411067)
महत्वाची टीप :-
फक्त ऑनलाईन केलेला फॉर्म किंवा ईमेल द्वारे केलेला फॉर्मचा विचार केला जाणार नाही त्यामुळे हे सर्व डॉक्युमेंट्स हे स्पीड पोस्ट ने पाठवायला विसरू नका.