आधार कार्ड अपडेट
Aadhar card update : आधार कार्ड ची नोंदणी करता वेळेस अनेकदा चुका होऊन जातात. व काही वेळेस अनेक जणांना स्थलांतर केल्यामुळे कार्डमधील माहितीमध्ये बदल करावे लागतात.
आधार कार्ड हे एक महत्त्वाचे कार्ड म्हणून अनेक वेगवेगळ्या ठिकाणी आधार कार्ड हे कागदपत्र म्हणून वापर करण्यात येते.
जर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करायचे असेल , तर तुम्हाला आता खूप चांगली संधी मिळालेली आहे. आता तुम्ही घरी बसल्या एकही रुपया न देता करू शकता आधार कार्ड अपडेट.
असे करा आधार अपडेट
युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया ही एक आधार कार्ड बनवणारे सरकारी संस्था आहे आता या संस्थेमार्फत आपणास मोफत आधार कार्ड अपडेट करण्याचा लाभ मिळत आहे.
मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत : | 14 सप्टेंबर 2024 पर्यंत. |
- तुमचे आधार कार्ड जर दहा वर्ष जुने जरी असले तरीही तुम्ही 14 सप्टेंबर पूर्वी मोफत आधार कार्ड अपडेट करू शकाल.
यासाठी तुम्हाला आधार पोर्टल वरूनच आधार कार्ड हे मोफत अपडेट करावे लागणार. जर तुम्ही आधार कार्डचा सेंटरवर किंवा सेतू वर जाऊन आधार कार्ड अपडेट करत असाल तर तुम्हास पन्नास रुपये चार्ज द्यावे लागतील.
तुम्ही मोफत आधार कार्ड अपडेट फक्त ऑनलाईन द्वारेच करू शकतात. आधार कार्ड अपडेट करण्याच्या स्टेप्स व आधार अपडेट वेबसाईट लिंक खाली दिलेल्या आहेत.
लखपती दीदी योजना येथे पहा संपूर्ण माहिती
स्टेप्स :
- सर्वप्रथम तुम्हास यु आय डी ए आय च्या असलेल्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन भेट द्यावी लागेल.
🔴आधार अपडेट लिंक🔴
👉🏻👉🏻👉🏻 Myaadhar.uidai.gov.in
- त्यानंतर तुम्हाला वरच्या बाजूला आधार अपडेट करण्यासाठी पर्याय दिसेल तिथे क्लिक करा.
- यापुढे तुम्हाला तुमचा दहा अंकी असणारा आधार क्रमांक टाकून तुमच्या फोन नंबर वरती जो ओटीपी येईल तो पण टाकावा लागेल.
- त्यानंतर लॉगिन करून घ्या.
- यानंतर डॉक्युमेंट अपडेट व्हेरिफिकेशन वर क्लिक करा.
- तिथे तुम्हाला ड्रॉपडाऊन च्या मेनू मध्ये तुमचे ओळखपत्र हे अपलोड करावे लागणार.
- इतक्या झाल्यानंतर तुम्हास सबमिट बटन वर क्लिक करायचे आहे. तिथे तुम्हाला रिक्वेस्ट नंबर हा जनरेट होईल.
यानंतर तुम्हाला आधार अपडेट चे स्टेटस पहावयास मिळेल ते तुम्ही तपासू शकता.