Mazi Ladki Bahin Yojana List Download माझी लाडकी बहीण योजनेची यादी महाराष्ट्र सरकारकडून जाहीर तर झालेली आहे पण हीच पीडीएफ यादी आपल्याला डाऊनलोड कशा पद्धतीने करायची.? हेच आज आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत. ज्यांनी लाडकी बहीण योजनेत अंतर्गत अर्ज केला आहे अशा महिलांना जिल्ह्याप्रमाणे मंजूर झालेल्या अर्जाची एक पीडीएफ यादी डाऊनलोड करता येणार आहे. राज्यातील ज्या महिलांची नावे या यादीमध्ये असणार आहेत त्या सर्व महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणार आहेत.
लाडकी बहीण योजनेसाठी ही असेल पात्रता
लाडकी बहीण योजनेसाठी अर्जदार महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असायला हवी.
या महिलेचे वय कमीत कमी 21 वर्षे आणि जास्तीत जास्त 65 वर्षे असावी.
राज्यांमधील विधवा विवाहित, घटस्फोटीत, निराधार आणि राज्यांमधील कुटुंबातील एकच अविवाहित महिला पात्र असेल.
अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
अर्जदार महिलेचे बँक खाते आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक अशी लिंक असावे.
लाडकी बहीण योजनेची यादी अशी करा डाऊनलोड
महाराष्ट्र सरकारच्या या https://dhulecorporation.org/mr/chief-minister-my-beloved-sister-beneficiary-list/ अधिकृत वेबसाईट वरती जायचं आहे.
आता पुढे माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी वरती क्लिक करायचा आहे.
इथे आपल्याला आपल्या जिल्ह्याचे नाव टाकायचे आहे.
आता आपला आधार नंबर इथे आपल्याला प्रविष्ट करायचा आहे.
जिल्ह्यामधील वार्ड क्रमांक प्रमाणे आपल्याला लिस्ट मिळेल आणि त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे.
त्यानंतर याची पीडीएफ फाईल मोबाईल मध्ये डाऊनलोड होणार आहे ती यादी आपण पाहू शकता.
या दिवशी मिळणार महिलांना पैसे.
माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे 17 ऑगस्ट 2024 या दिवशी पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. त्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे मिळून तीन हजार रुपये सरकारकडून जमा करण्यात येणार आहेत.