Maharashtra Polytechnic Admissions 2024 | diploma cap round 2024

Maharashtra Polytechnic Admissions 2024

college list:-

कॉलेज लिस्ट कशी बनवायची याची आपल्याला कोणत्याही प्रकारची माहिती नसेल, तर आपण योग्य वेबसाईटवर आलेला आहात.

step 1 : पहिल्यांदा आपण कोणत्या क्षेत्रात किंवा कोणत्या फिल्डमध्ये ऍडमिशन घेणार आहात , हे नक्की कन्फर्म करा.

step 2: त्यानंतर आपल्याला हवे असणाऱ्या शहरा मधील कॉलेज ची एक लिस्ट तयार करा.

step 3: त्यानंतर आपण केलेल्या कॉलेज लिस्ट ही कॅप राऊंड 1 मध्ये ऍड करा पण , आपण लिस्ट ही आपल्याला हव्या असणाऱ्या कॉलेजच्या योग्यतेनुसार करावी उदाहरणार्थ:आपल्याला ज्या कॉलेजला सर्वाधिक ऍडमिशन घेण्याची इच्छा आहे ,तेच कॉलेज सर्वप्रथम ऍड करायचे त्यानंतर बाकीचे कॉलेज सुद्धा त्याचप्रमाणे ॲड करायचे.

step 4:-कॅप राऊंड ची माहिती मी पुढे दिलेली आहे आणि त्यांच्या डेट सुद्धा दिलेल्या आहेत, त्या तारखेनुसार आपण कॅप राऊंड साठी अर्ज करू शकतात. आपल्याला कॅप राऊंड मध्ये भेटलेल्या कॉलेज आपण MSBTE अधिकृत वेबसाईटवर जाऊन कॉलेजचे नाव पाहू शकतात.

step 5: त्यानंतर मिळालेल्या कॉलेजमध्ये जाऊन आपण ऍडमिशनची पुढील माहिती किंवा ऍडमिशन घेऊ शकतात कॅप राऊंडच्या डेट साठी आपण पुढे पाहू शकाल.

diploma cap round 2024 :

cap round 1:-

ज्या विद्यार्थ्यांनी डिप्लोमा चा प्रवेश घेण्यासाठी अर्ज केला होता त्यांची लास्ट डेट ही 25 जून होती.
त्यानंतर कॅप राऊंड साठी चा MSBTE Schedule द्वारे देण्यात आलेल्या आहे.
तर कॅप राऊंड वन ( cap round 1 ) ची डेट ही 11 जुलै पासून ते 12 जुलै पर्यंत आहे. कॅप राऊंड वन ( cap round 1 ) चा रिझल्ट हा 13 जुलै ला लागण्याची शक्यता आहे.

कॅप राऊंड 1 ( cap round 1 ) मध्ये भेटलेले कॉलेज ला ऍडमिशन घेण्यासाठी आपण 15 जुलै ला भेटलेल्या कॉलेजमध्ये जाऊन आपले ऍडमिशन कन्फर्म करू शकतात.

cap round 2:-

कॅप राऊंड दोन ची तारीख ही 17 जुलै ते 18 जुलै आहे. कॅप राऊंड दोन चा निकाल 19 जुलै ला लागण्याची शक्यता आहे.

cap round 3:
कॅप राऊंड 3 लास्ट कॅप राऊंड ची तारीख 23 जुलै ते 24 जुलै आहे त्याचा निकाल 25 जुलै ला लागण्याची शक्यता आहे.

कॅप राऊंड मध्ये निवड झालेले किंवा योग्य पात्रता असल्यास विद्यार्थ्यांनी पुढील दिलेले ऍडमिशन प्रोसेस मध्ये जाऊन ऍडमिशन कसे करायचे हे जाणून घेणे धन्यवाद.

cap round Miss:-
जर कॅप राऊंड मिस झालं तर ऍडमिशन घेण्यासाठी आपण हवे असलेल्या कॉलेज ला जाऊन मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश घेऊ शकतात.

 

admission process :

आपण वरील दिलेल्या date नुसार टाकलेले कॉलेज ची लिस्ट लागल्यानंतर , लागलेल्या कॉलेज मध्ये जाऊन त्या ठिकाणी ऍडमिशनची प्रोसेस करावी. जर का आपल्याला कॅप राऊंड वन मध्ये मिळालेले कॉलेज आवडले नाही , तर आपण दोन साठी जाऊ शकतो त्यासाठी आपल्याला भेटलेल्या कॉलेजमध्ये जाऊन फ्रीज कॉलेज हे ऑप्शन फील करावे लागेल.
फ्रिज कॉलेज साठी आपल्याला 1000 रुपये एवढी फी आहे.

जर का आपल्याला कॅप राउंड 2 किंवा पुढील कॅप राऊंड मध्ये हवे असलेले कॉलेज मिळाले नाही, तर आपण फ्रीज केलेले कॉलेज मध्ये ऍडमिशन घेऊ शकतो.
परंतु जर आपल्यास पुढील कॅप राऊंड मध्ये कॉलेज मिळाले तर फ्रिज केलेले कॉलेज मध्ये आपण ऍडमिशन घेऊ शकणार नाही .

विविध महाविद्यालयांमध्ये आणि कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी  MSBTE च्या ऑफिशियल अधिकृत वेबसाईटला विजिट करा.

Leave a Comment