Saksham Bahin Yojana नमस्कार मित्रांनो, लाडकी बहिणी योजनेला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर आता सरकार महिलांसाठी अजून एक नवीन योजना आणत आहे. राज्य सरकारने मागील वर्षी आणि यावर्षी बऱ्याचशा नवनवीन योजना आणलेले आहेत. येणार आहे विधानसभा निवडणूक आठवड्यासमोर ठेवूनच महायुती सरकारकडून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत राज्यामधील पात्र असलेल्या महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळतात हे तर आपल्या सर्वांना माहितीच आहे. सरकारच्या या योजनेचे राज्यभर कौतुक सुद्धा महिलांकडून होत आहे पण या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर आर्थिक भर पडत आहे आणि कर्जदात्यांच्या पैशातूनच या योजनेचे पैसे महिलांना मिळत आहेत. अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे. तरी देखील महायुती सरकारकडून या सगळ्याकडे लक्ष न देता ही योजना सुरूच ठेवली.
हे पण वाचा, प्रत्येक तरुणाला आता महिन्याला मिळतील 5 हजार रुपये.? “ही” आहे योजना
आता पुढे महिलांसाठी सरकारकडून अजून एक नवीन योजना आखली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेनंतर आता भाजप नेते डोंबिवलीकर आमदार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सक्षम भगिनी उपक्रमाची सुरुवात केलेली आहे. सरकारच्या या उपक्रमा अंतर्गत महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी देणार आहेत. या उपक्रमा अंतर्गत जवळपास 5000 पेक्षा अधिक महिलांनी सहभाग देखील घेतलेला आहे.
सक्षम भगिनी योजनेची सुरुवात
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री योजना आणली. त्यामुळे महिलांना आर्थिक मदत देखील केली जात आहे. परंतु आता नवीन सक्षम भगिनी उपक्रमाची सुरुवात केलेली जात आहे. महिलांना आत्मनिर्भर बनवणे आणि त्यांना रोजगार मिळणे हा या योजनेचा मुख्य योजना आहे. डोंबिवलीतील महिलांच्या बचत गटांना विना भांडवल उत्पादनाची संधी मिळून देण्यासाठी नवरात्रीच्या निमित्ताने या उपक्रमाचे उद्घाटन देखील करण्यात आलेले आहे. या योजनेमध्ये आतापर्यंत 5000 पेक्षा जास्त महिलांनी सहभाग देखील घेतलेला आहे.
महिलांनी तयार केलेले पदार्थ विकता येणार
या उपक्रमांतर्गत शहरातील महिलांनी तयार केलेले पदार्थ वस्तू ऑर्डर नुसार वितरकांपर्यंत तसेच ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची काम देखील केले जाणार आहे. त्यामुळे महिलांना गरज वस्तू तयार करण्याची आणि कोणालाही त्रास न देता उत्पन्न मिळवण्याची चांगली संधी निर्माण झालेली आहे. या उपक्रमामुळे महिलांना मोठ्या प्रमाणात स्वावलंबी बनण्यास मदत होईल, असे म्हणून मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले आहे.