SBI Recruitment 2024 | SBI स्पेशल ऑफिसर भरती

SBI स्पेशल ऑफिसर भरती

SBI Recruitment 2024

SBI स्पेशल ऑफिसर भरती : स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नवीन जागेसाठी भरती करणे बाबत सूचना जाहीर केले आहे. या जागेसाठी तब्बल 1129 जागा भरण्याचे संकेत दिले आहेत तसेच या जागेची भरती प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने होणार आहे, यासाठी उमेदवाराला एसबीआयच्या ऑफिसियल वेबसाईट वरती जाऊन आपला अर्ज दाखल करायचा आहे. हे अर्ज करण्यासाठी आपल्याला खाली लिंक दिलेली आहे या लिंकच्या माध्यमातून आपण अर्ज भरू शकतो.

या जागेसाठी भरती प्रक्रिया 19 जुलैपासून चालू असून याची अंतिम तारीख 8 ऑगस्ट अशी ठेवण्यात आलेली आहे. या जागेसाठी कोणत्याही राज्यातील महिला तसेच पुरुष या ठिकाणी आपली अर्ज प्रक्रिया करू शकतात. भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या दहा विविध प्रकारच्या पदांसाठी ही भरती होणार आहे.

प्रामुख्याने या जागेसाठी पुढील रिक्त पद भरणे आहे, प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर, रिलेशनशिप मॅनेजर वी मॅनेजर, क्षेत्रीय प्रमुख, केंद्रीय अनुसंधान संघ, निवेश अधिकारी या प्रकारचे पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत. या पदासाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या उमेदवारास कमीत कमी एक लाख 70 हजार ते पाच लाख 50 हजार एवढे वेतन घोषित करण्यात आले आहे. तर या जागेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया करणे आहे व याची अर्ज करण्याची तारीख 19 जुलैपासून 8 ऑगस्टपर्यंत ठेवण्यात आलेली आहे.

1129 जागेसाठी सुवर्णसंधी,आकर्षक वेतन.

SBI Recruitment 2024 एसबीआयच्या या भरतीमध्ये वेगवेगळ्या दहा प्रकारच्या जागा भरणे आहे त्यासाठी एकूण 1129 इतक्या जागा भरण्याचे अधिकाऱ्यांनी सूचित केलेले आहे. या जागेसाठी अर्ज भरण्यासाठी सामान्य व ओबीसी तसेच पीडब्ल्यूडी उमेदवारांना 750 रुपये एवढे शुल्क आकारण्यात येणार आहे. या जागेसाठी उमेदवाराकडे डिग्री किंवा डिप्लोमा असणे आवश्यक राहणार आहे, यामध्ये एसबीआय स्पेशलिस्ट ऑफिसर साठी विशेष डिग्री असणे आवश्यक आहे. एसबीआय प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर साठी बँक अथवा वेल्थ मॅनेजमेंट मॅनेजर म्हणून कमीत कमी पाच वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. एसबीआय रिलेशनशिप मॅनेजर: या जागेसाठी स्नातक व वेल्थ मॅनेजमेंट यांचा कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. विपी मॅनेजमेंट: या या जागेसाठी खाजगी विदेशी बँका किंवा सर्वजणी बँक अशा ठिकाणी काम केल्याचा 6 वर्षाचा अनुभव असणे बंधनकारक राहणार आहे. एसबीआय एरिया मॅनेजर साठी खाजगी विदेशी किंवा सार्वजनिक बँकांमध्ये कमीत कमी बारा वर्षे काम करण्याचा अनुभव उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.

एसबीआय इन्व्हेस्टमेंट स्पेशलिस्ट : या पदासाठी उमेदवाराकडे सहा वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे.

अशा प्रकारे वरील जागा भरण्यासाठी नियम व अटी आहेत तसेच यासाठी उमेदवाराचे वय 23 वर्ष ते पन्नास वर्षे अशा प्रकारची आठ या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे.

अशाप्रकारे वरील पदांसाठी अर्ज करण्या साठी उमेदवाराकडे खालील शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे,

  • दहावी /बारावी मार्कशीट.
  • पदानुसार डिग्री किंवा डिप्लोमा प्रमाणपत्र.
  • अनुभव प्रमाणपत्र तसेच फॉर्म 16.
  • जात प्रमाणपत्र
  • पासपोर्ट फोटो
  • मोबाईल नंबर व ईमेल आयडी.

 

या पदासाठी उमेदवाराला अर्ज करण्यासाठी इंडिया पोर्टल वरती पूर्ण माहिती दिलेली आहे ती पुढील प्रमाणे आहे.

  • एसबीआय वेबसाईट.
  • एसबीआय सिलेक्शन वरती क्लिक करणे
  • त्यानंतर ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे ते पेज ओपन होणार आहे
  • त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण पदाची लिस्ट दिसेल.
  • अशाप्रकारे वेबसाईटवर गेल्यानंतर स्टेप बाय स्टेप पूर्ण माहिती आपल्याला भरावयाचे आहे
  • व त्यानंतर लॉगिन करून पूर्ण माहिती सबमिट करण्यात करणे आवश्यक आहे.

मीशो वरून घरी बसल्या काम करा पाहा कसा अर्ज करावा

तर अशाप्रकारे एसबीआय भरतीसाठी वरी दिलेल्या पदाबाबत तसेच कागदपत्र व वेबसाईट यावरती आपली पूर्ण माहिती सबमिट करून उमेदवाराला ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे तर मित्रांनो ही होती एसबीआय भरती बद्दल माहिती तर अशाच नवनवीन भरतीसाठी व आकर्षक वेतन जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा जय हिंद

Leave a Comment