Ration Card New Update नमस्कार मित्रांनो, तुम्ही सुद्धा मोफत राशन घेत आहात तर तुमच्यासाठी ही कामाची बातमी असणार आहे कारण की आपल्याला काही कामे करावी लागणार आहेत आणि ही कामे जर आपण केली नाही तर आपल्याला मोफत राशन मिळणे बंद होणार आहे. त्यामुळे आता काय आपल्याला काम करायचं आहे.? याची माहिती आज आपण आपल्या न्यूज पोर्टल वरती घेणार आहोत. रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे कारण की तुम्ही सुद्धा मोफत रेशन घेत आहात तर केंद्र सरकारच्या माध्यमातून हे मोफत रेशन बंद होऊ शकते.
कोरोना काळापासून केंद्रामधील नरेंद्र मोदी सरकार अंतर्गत राशन कार्डधारकांना मोफत अन्नधान्य पुरवण्यास सुरुवात केली आहे पण बरेचसे नागरिक अपात्र असून सुद्धा मोफत रेशन च लाभ घेत असल्याचं उघडकीस आलं. एकदा असही प्रकरण समोर झालेला आहे की ज्यामध्ये एकाच लाभार्थ्याच्या नावाने वेगवेगळ्या ठिकाणी रेशनचा लाभ घेतल्याचा दिसलेला आहे. यामुळे केंद्र सरकारने अशा प्रकरणावर बंदी घालण्यासाठी आणि अशा अपात्र नागरिकांचे रेशन बंद करण्यासाठी एक उपाय योजना आखलेली आहे ती म्हणजे रेशन कार्डधारकांना आधार कार्ड रेशन शी लिंक करणे अनिवार्य केलेले आहे.
30 सप्टेंबर च्या अगोदर राशन कार्ड आधार कार्ड ला लिंक करा.
आधार कार्ड रेशन कार्ड ला लिंक केल्यानंतर अपात्र लोकांची ओळख सहजरीत्या पटवता येणार आहे त्यामुळे ही प्रोसेस करावी लागणार आहे. आता देशभरातील सगळ्याच रेशन कार्डधारकांनी त्यांच्या रेशन कार्ड ला आधार कार्ड लिंक करायचे आहे. आणि तुम्ही अजून पर्यंत रेशन कर्डला आधार कार्ड लिंक नसेल केले तर लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. कारण की 30 सप्टेंबर पर्यंत जे नागरिक रेशन काढला आधार कार्ड लिंक करणार नाहीत त्यांना मोफत राशन मिळणे बंद होणार आहे. दिलेल्या कालावधीमध्ये आधार कार्ड रेशन कार्ड ला लिंक केले तर रेशन मिळणे बंद होणार नाही त्यामुळे 30 सप्टेंबरच्या अगोदर ही काम करून घ्या.
अशा पद्धतीने ऑनलाईन आधार लिंक करा
रेशन कार्ड ला आधार कार्ड लिंक करण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला सार्वजनिक वितरण प्रणालीच्या या 👉https://nfsa.gov.in/portal/PDS_page वेबसाईट वरती भेट द्यायची आहे.
जर तुम्ही या वेबसाईटवर पहिल्यांदाच आला आहात तर तुमचे अकाउंट इथे ओपन करायचे आहे म्हणजेच आपल्याला रजिस्ट्रेशन करायचे आहे.
रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला लॉगिन करायचे आहे. यानंतर या पोर्टल वरती आपल्याला रेशन कार्ड नंबर आणि इतर महत्त्वाची माहिती भरायची आहे.
आता पुढे आवश्यक माहिती भरल्यानंतर सबमिट ऑप्शन वरती क्लिक करून नोंदणी कृत मोबाईल नंबर वरती ओटीपी येणार आहे.
ओटीपी वेरिफिकेशन झाल्यानंतर आपल्याला आपलिकेशन कन्फर्मेशन मेसेज मिळणार आहे. आणि आपले आधार कार्ड रेशन कार्ड शी लिंक होणार आहे.